पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 11 वर्षानंतर सत्तांतर

महाविकास आघाडीच्या पंधरा जागा विजयी
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 11 वर्षानंतर सत्तांतर

पारोळा - प्रतिनिधी parola

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) गेल्या अकरा वर्षानंतर सत्तांतर होऊन शिंदे गटाच्या शिवसेनेकडून (shivsena) महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे. यात विद्यमान सभापती अमोल चिमणराव पाटील यांचा डॉक्टर हर्षल माने यांनी 86 मतांनी पराभव केला आहे. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली तर दीड वाजेपर्यंत ही मतमोजणी सुरू राहिली या दरम्यान महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशे गुलाल उधळत मिरवणूक काढण्यात आली.

सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात सतीश भास्करराव पाटील मिळालेली मते 490, रोहन वसंतराव मोरे 485, रवींद्र रामभाऊ पाटील 430, बबन खंडेराव पाटील 428, प्रकाश गुमानसिंग पाटील 384, पुरुषोत्तम सिताराम पाटील 390, नगराज रामभाऊ पाटील 400 हे उमेदवार विजयी झाले आहेत तर ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात निंबा बाबुलाल पाटील 358, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात लक्ष्मीबाई दिलीप रामोशी 361 ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात मनोराज विश्राम पाटील ३७१, सुधाकर भास्कर पाटील 393 हे विजयी झालेत व्यापारी मतदारसंघात अनिल पुंडलिक मालपुरे 55, जितेंद्र मधुकर शेवाळकर 55 हे विजयी झालेत सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघात डॉक्टर हर्षल मनोहर माने 402 मतांनी विजयी झाले आहेत.

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 11 वर्षानंतर सत्तांतर
रावेर बाजार समितीत ११ जागांवर महविकास आघाडी ; सोसा. मतदार संघातील मतमोजणी सुरु

सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघात बबीता संभाजी पाटील 423, रेखाताई सतीश राव पाटील 495 या विजयी झाल्या आहेत सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात सुरेश शंकर वंजारी 445 मतं मिळवून विजयी झाले आहेत तर हमाल मापाडी मतदारसंघात राजु भिका मराठे हे 67 मतांनी विजयी झाले आहेत सदर 18 जागांपैकी 15 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे तर तीन जागेवर जय किसान पॅनल ने विजय मिळवला आहे.डाँ सतीश पाटील व सौ रेखाताई पाटील या दोघांचे नामांकन पत्र अवैध ठरविण्यात आले होते त्यांनी हायकोर्टात अपील केल्यानंतर त्यांचे अर्ज वैध झालेत म्हणून त्यांच्या पॅनलला बहुमत मिळाले अन्यथा आज ते या निवडणुकीतून बाहेर राहिले असते आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या पॅनलला एकतर्फी विजय मिळविता आला असता हे नक्की

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com