
पारोळा - parola
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील (MSEDCL) महावितरणच्या विरोधातील शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला (jalgaon-dhule) जळगाव व धुळे जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला असल्याचे डॉ.पृथ्वीराज श्रीराम पाटील अध्यक्ष शेतकरी संघटना (Farmers Association) पारोळा, तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य स्वतंत्र भारत पक्ष यांनी सांगितले.
यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आज जी वेळ आली आहे ती आपल्यावर देखील येऊ शकते म्हणून आंदोलनासाठी तयार रहावे, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या सर्वांना सोबत राहून लढावे लागेलं असेही डॉ.पृथ्वीराज श्रीराम पाटील, शेतकरी संघटना पारोळा यांनी सांगितले.