पेपर मीलला आग ; लाखोचे नुकसान

पेपर मीलला आग ; लाखोचे नुकसान

सुनसगाव ता.भुसावळ - वार्ताहर Bhusaval

येथून जवळच असलेल्या गोजोरा रस्त्यावरील शक्ती (Paper miles) पेपर मीलच्या बाहेरील साहित्य असलेल्या ठिकाणी आज दि.६ रोजी दुपारी १२ वाजे सुमारास (fire) आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीच्या कामगारांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला मात्र वारा सुरु असल्याने (Fire brigade) अग्निशामक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले.

पेपर मीलला आग ; लाखोचे नुकसान
अखेर 'तुकडाबंदी'चे परिपत्रक खंडपीठात रद्दबातल

तसेच तरीही आग आटोक्यात येत नसल्याने दहा ते बारा (Water tanker) पाण्याचे टँकर बोलवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते. अखेर आग आटोक्यात आणण्यात आली असून कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

या आगीत कंपनीच्या बाहेर ठेवलेली लाकडे, पुठ्ठे, कच्चा माल जळून खाक झाल्याचे कंपनी व्यवस्थापकांनी सांगीतले आहे.

या ठिकाणी (Bhusawal Taluka Police Station) भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे व पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीचे कारण कळू शकले नाही.

Related Stories

No stories found.