पंचायत समितीतील कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू

पंचायत समितीतील कर्मचार्‍याचा अपघातात मृत्यू

जळगाव jalgoan । प्रतिनिधी

मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यात झालेल्या दुचाकीच्या अपघातात (two-wheeler accident) पंचायत समितीमधील (Panchayat Samiti) कर्मचारी रत्नदीप विजय कोचुरे (Ratnadeep Vijay Kochure) (वय-35, रा. मुक्ताईनगर, मूळ रा. जळगाव) या तरुणाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुळचा जळगावातील रत्नदीप कोचुरे हे मुक्ताईनगर पंचायत समितीमध्ये (Panchayat Samiti) नोकरीस आहे. सोमवारी ते त्यांच्या एका सहकार्‍यासह काही कामामित्त मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील गावात गेले होते. त्याठिकाणावरील काम आटोपुन घरी येत असताना मुक्ताईनगर शहराजवळ त्यांची दुचाकी घसरुन अपघात (two-wheeler accident) झाला. यात रत्नदीप कोचुरे हे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर आदळले गेले. यात कोचुरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death on the spot) झाला. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्‍यांना देखील गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

एकुलत्या एक मुलगा गेल्याने बसला जबर धक्का

अपघातात मयत झालेले रत्नदीप कोचुरे हे एकुलते एक होते. त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने त्यांच्या कुटुंबियांना (families) जबर मानसिक धक्का बसला आहे.

चार वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरुन हरपले पितृछत्र

सोमवारी रात्री झालेल्या या दुर्दुेवी अपघातात त्यांच्या चार वर्षाच्या मुलाच्या डोक्यावरुन पितृछत्र हरपले आहे. मंगळवारी दुपारी जळगावात रत्नदीप कोचुरे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com