न्हावीच्या पल्लवी भारंबे राज्यस्तरीय आदर्श आरोग्यसेविका सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

न्हावीच्या पल्लवी भारंबे राज्यस्तरीय आदर्श आरोग्यसेविका सेवारत्न पुरस्काराने सन्मानित

न्हावी. Nhavi ता. यावल वार्ताहर -

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (Manpower Development Public Service Academy) संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय (State Level) गुणिजन गौरव महासंमेलन (Gunijan Gaurav Mahasammelan) आणि पुरस्कार वितरण (Prize distribution) सोहळा नाशिक शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. यात प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) हिंगोणा उपकेंद्र न्हावी (Nhavi) येथील आरोग्य सेविका (Health worker) श्रीमती पल्लवी पुरुषोत्तम भारंबे (Pallavi Bharambe) यांना राज्य स्तरीय आदर्श आरोग्यसेविका सेवारत्न पुरस्काराने (Ideal Health Worker Seva Ratna Award) सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी (Award) निवडलेल्या १५१ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक,सन्मानचिन्ह आणि मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन (International Talent Icon) डॉ. जयलक्ष्मी सानिपीना राव या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सुप्रसिध्द साहित्यिक रमेश आव्हाड हे या समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही घटनाकारांनी दिलेली संविधानमूल्ये (Constitutional values) गुणिजनांनी प्राणपणाने जपावीत, असे आवाहन त्यांनी आपल्या बीजभाषणात केले.

सुप्रसिद्ध समाजसेविका आणि समुपदेशिका मिनाक्षी गवळी (Counselor Meenakshi Gawli) या समारंभाच्या मार्गदर्शक होत्या. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या मनिषा कदम यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी प्रकाश सावंत, लक्ष्मणराव दाते, अमोलराव सुपेकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना (Rashtra Vandana) सादर करून समारंभाची सांगता केली. वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या गुणिजन संस्थेचा हा २२ व्या वर्षातील पुरस्कार सोहळा होता. श्रीमती पल्लवी भारंबे यांना आदर्श आरोग्यसेविका सेवारत्न पुरस्कार मिळाल्याने परिवार तसेच मित्र परिवारकडून सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.