पळासखेडे सिम सरपंचपदी सौ.मीनाबाई पाटील बिनविरोध

पळासखेडे सिम सरपंचपदी सौ.मीनाबाई पाटील बिनविरोध

पारोळा - प्रतिनिधी parola

तालुक्यातील पळासखेडे सिम येथील ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) सरपंचपदी (Sarpanch) सौ.मिनाबाई हिरालाल पाटील यांची तर उपसरपंचपदी सौ.अनिताबाई भारत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पळासखेडे सिम सरपंचपदी सौ.मीनाबाई पाटील बिनविरोध
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

पळासखेडा सिम तालुका पारोळा येथे दि.16 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडसाठी सभा घेण्यात आली. सरपंच पदासाठी सौ.मिनाबाई पाटील व उपसरपंच पदासाठी सौ.अनिताबाई पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच सौ.सिमा पाटील, सुनंदा पाटील, सजय पाटील, रामकृष्ण पाटील, भगवान मोरे व गावातील प्रतिष्ठित नागरीक पारोळा पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील, वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील, माजी सरपंच विनोद पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, विकासो.चेअरमन परशुराम पाटील, नारायण पाटील, शांताराम पाटील ज्ञानेश्वर पाटील पोलीस पाटील सौ. ललिता पाटील, रोजगार सेवक हिरालाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पळासखेडे सिम सरपंचपदी सौ.मीनाबाई पाटील बिनविरोध
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

सौ.मीनाबाई पाटील या प्रगतशिल शेतकरी हिरालाल गंगाराम पाटील यांच्या पत्नी असून श्री स्वामी समर्थ माध्यमिक विदयालयाचे शिक्षक मनोहर पाटील यांच्या आई आहेत. सौ.मिनाबाई पाटील यांच्या निवडीचे एरंडोल पारोळा भडगांव मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी अभिनंदन केले.

पळासखेडे सिम सरपंचपदी सौ.मीनाबाई पाटील बिनविरोध
Visual Story अभिनेत्री प्राजक्ताचं पहिलं प्रेम...

निवडणूक अधिकारी म्हणून राठोड यांनी काम पाहिले तर त्यांना ग्रामसेवक पी.एन. पाटील , भाऊसाहेब पाटील, योगेश पवार, शिपाई यांनी विशेष सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com