पाचोर्‍यात लाचखोर कृषी सहाय्यक जाळयात

पाचोर्‍यात लाचखोर कृषी सहाय्यक जाळयात

पाचोरा Pachora (प्रतिनिधी)-

शेतीसाठी लागणार्‍या पावर ट्रेलर मशीनवर (Power trailer machine) मिळणारी सबसीडी बँक खात्यात (Subsidy in bank account) जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच (Bribe) घेणार्‍या कृषी सहाय्यकास (Agricultural Assistant) एसीबी पथकाने (ACB squad) रंगेहात पकडले.(Caught) या कारवाईमुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहे. त्यांनी त्यांच्या आईच्या नावे कृषी यांत्रिकीकरण योजने (Agricultural mechanization scheme) अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बी.सी.एस. पावर ट्रिलर मशीन (Power trailer machine) घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. हा अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मंजूर झाला होता.

मशीन खरेदी केली असता सदर योजनेअंतर्गत मिळणारी 85 हजार रुपयांची सबसिडी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक (Agricultural Assistant) ललितकुमार विठ्ठल देवरे(Lalit Kumar Vitthal Deore) (वय-32) रा. आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मिल जवळ, पाचोरा याने दीड रुपयाची मागणी केली होती.

याबाबत तक्रार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे (bribery department) तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार दि. 24 मार्च रोजी पथकाने सापळा रचून 1 हजार 500 रुपयांची लाचेची रक्कम स्विकारतांना (accepting the amount) पकडले. या कारवाईमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदर ची कारवाई पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहिरे, पो. हे. कॉ. सुनिल पाटील, पो. हे. कॉ. रविंद्र घुगे, पो. हे. कॉ. शैला धनगर, पो. ना. मनोज जोशी, पो. ना. जनार्धन चौधरी, पो. ना. सुनिल शिरसाठ, पो. कॉ. प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो. कॉ. ईश्वर धनगर, पो. कॉ. प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com