पाचोरा : भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा सहभाग

पाचोरा : भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा सहभाग

पाचोरा - प्रतिनीधी pachora

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय एकात्मततेसाठी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) शेगाव (Shegaon) येथील विराट सभेसाठी पाचोरा- तालुक्यातून हजारो कार्यकर्तेसह शेतकरी, शेतमजूर, व्यापारी सहभागी होण्याचा शासकीय विश्राम गृहात निर्धार करण्यात आला

पाचोरा : भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा सहभाग
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी बोलविलेल्या महाविकास आघाडिच्या बैठकीत राष्टवादी काँग्रेसचे नेते माजी आ.दिलिप वाघ, शिवसेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांचेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अझर खान,रणजित पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, शहराध्यक्ष अॅड.अमजद पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, सरचिटणीस प्रताप पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र महाजन, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस कुसुमताई पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील, मुकेश तुपे, गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड.अंबादास गिरी, तालुका एससी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, अजबराव काटे, रवींद्र महाजन, अमरसिंग पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.

पाचोरा : भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा सहभाग
टिटवापाणी पाडा शिवारातील गांजा शेती भुईसपाट

यावेळी पाचोरा शहर आणि ग्रामीण भागातील जनतेने सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडी च्या नेत्यांनी सामुहिक आवाहन केले आहे. शेगाव जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी दि १४ नोव्हेंबर पर्यंत संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.

पाचोरा : भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीचा सहभाग
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com