रावेर रेल्वे स्थानकावर पीएसी कमिटी सदस्यांनी केली पाहणी

प्रवाशांकडून पुणे-पटणा गाडीला थांबा मिळण्याची मागणी
रावेर रेल्वे स्थानकावर पीएसी कमिटी सदस्यांनी केली पाहणी

रावेर|प्रतिनिधी raver

रावेर रेल्वे स्थानकावर (railway station) नुकतीच (PAC committee member) पीएसी कमिटी सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रवाश्याकडून पुणे-पटणा गाडीला (Pune-Patna Railway) थांबा मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

येथील रेल्वे स्थानकाची पीएसी कमिटीने भेट देत पाहणी केली.यात कमिटी सदस्य डॉ.राजेंद्र फडके (जळगाव), (jalgaon) अभिलाश पांडे (Jabalpur) (जबलपूर), छोटू पाटील (surat) (सुरत), विभा अवस्थी (रायपुर), कैलास वर्मा (मुंबई) यांचा समावेश होता.रावेर लोकसभा व विधानसभा मतदार संघ असल्याने महत्वपूर्ण रेल्वे स्टेशन आहे.केळीने समृद्ध असलेल्या रावेरहुन मोठ्या प्रमाणात पुण्यासारख्या महानगरात प्रवाशी व विद्यार्थ्यांची ये-जा होते. पुण्याकडे जाण्यासाठी येथून एकही रेल्वे नाही.त्यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स मोठ्या प्रमाणात चालतात,या खाजगी वाहतूक करणारे ट्रॅव्हल्स चालक प्रवाश्यांकडून मनमानी पद्धतीने आर्थिक लूट करतात,दीड हजार ते पासून ते अडीच हजार रुपयापर्यंत भाडे वसूल केले जाते. रावेर येथून पुणे जाण्यासाठी एक तरी रेल्वे असावी ही मागणी गेल्या २५ वर्षांपासूनची आहे.यापूर्वी देखील सर्व लोकप्रतिनिधी यांनी वारंवार मागणी केलेली असून, गांभीर्याने विचार करून पटना पुणे या गाडीला थांबा मिळावा अशी मागणी पद्माकर महाजन, दिलीप पाटील, रविंद्र पाटील, उमेश महाजन, प्रकाश महाजन यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.