फत्तेपूरहून बिरारी ज्वेलर्सचे मालक बेपत्ता

पत्नीची पोलीसांकडे तक्रार
फत्तेपूरहून बिरारी ज्वेलर्सचे मालक बेपत्ता

फत्तेपूर Fatehpur ता.जामनेर | वार्ताहर

येथील बिरारी ज्वेलर्सचे (Birari Jewelers) मालक (Owner) हे दि.२७ डिसें.रोजी 'जळगांव येथून रेल्वेचे तिकिट (Train ticket) काढून आणतो' असे पत्नीस सांगून राहत्या घरातून निघून (Leaving the house) गेले. अद्यापपर्यंत घरी आलेच नाही अशी खबर पत्नीने पोलीसांकडे (police) दिलेली आहे.

याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की,फत्तेपूर बाजारपेठेत बिरारी ज्वेलर्स म्हणून दुकान आहे. या दुकानाचे मालक विनोद ओंकार बिरारी(वय-४६), हे पत्नी, मुला

सह दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहतात. दि. २७ डिसेंबर रोजी सर्व परिवार नाशिक येथे चुलत पुतण्याच्या लग्नाला जाणार होते. त्यांची तयारी पत्नी करीत असतांना विनोद बिरारी यांनी पत्नीस सांगितले की मी जळगांव येथून आपले रेल्वेचे तिकिट काढून आणतो असे सांगून ते जळगांव येथे निघून गेले. बराच वेळ झाला तरी पती परत आले नाही म्हणून पत्नीने

विनोद बिरारी यांना फोन केला तर त्यांचा फोन बंद येत होता.तेव्हा त्यानी जामनेर येथे त्यांच्या आईस हा प्रकार सांगून त्या मुलांसह जामनेरला गेल्या.तेथून त्यांनी नातेवाईकांकडे- जळगांव, नाशिक,पिपळगांव,जामनेर,सिल्लोड,औरंगाबाद,येथे फोनकरून विचारणा केली.मात्र विनोद बिरारी हे मिळून आले नाही. म्हणून पत्नी सौ.ज्योती विनोद बिरारी (४१) यांनी पहूर पोलीस स्टेशन ला पती विनोद बिरारी हरविल्याची खबर दिलेली आहे.

विनोद बिरारी हे रंगाने गोरे,उंची- पाच फुट चार इंच,अंगात गुलाबी रंगाचा शर्ट,काळ्या रंगाची पॅन्ट व डाव्या हाताच्या दंडावर जन्मा पासून काळ्या रंगाची खून आहे. पत्नी ज्योती

बिरारी यांनी दिलेल्या खबरी वरून पहूर पो.स्टे. ला मिसिंग रंजि. नं.-४६/२०२१ प्रमाणे हरविल्या ची नोंद करण्यात आलेली आहे. ज्यांना ही व्यक्ती दिसून किंवा मिळून आल्यास त्यांनी पहूर, किंवा फत्तेपूर येथील पोलीसांकडे संपर्क साधावा असे आवाहन येथील पोलीस हे. कॉ.किरण शिंपी यांनी केलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com