जुगाड काढत संकटावर मात करणं हे तरुणाईचं लक्षण : यशवंत शितोळे

नूतन मराठा महाविद्यालयात करिअर कट्टा फलकाचे अनावरण
जुगाड काढत संकटावर मात करणं हे तरुणाईचं लक्षण : यशवंत शितोळे

जळगाव jalgaon

घडून गेलेल्या घटनांवर (over what happened) रडत (Crying) बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत जुगाड (Jugaad) काढत संकटावर मात करणं (Overcoming adversity) हे तरुणाईचं (youth) लक्षण आहे. तरुण म्हणजे युवा आणि युवा शब्दाला उलट केलं की वायु होतो म्हणून तरुणांनी वायुच्या वेगाने करियर (Career) पर्यत पोहचण्यासाठी करियर कट्टाची (Career Katta) निर्मिती आहे. असे मत यशवंत शितोळे (Yashwant Shitole) (अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी व्यक्त केले.

स्पर्धेच्या (competition) युगात विद्यार्थ्यांना (Students) अस्तीत्व टिकवून स्वतःला सिद्ध करण्यासाठी नूतन मराठा महाविद्यालयात नोकरी आणि व्यवसाय या दोघांची सांगड घालण्यात भरीव कामगिरी करणाऱ्या करिअर कट्टा (Career Katta) फलकाचे अनावरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ. संतोष चव्हाण (शिक्षण सहसंचालक जळगाव), प्रा.डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, (जिल्हा समन्वयक करिअर कट्टा,) प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख ,प्रा. संजय शिंगाणे (जिल्हा समन्वयक., प्रा.सौ क्रांती पाटील, (जिल्हा समन्वयक,) उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. जे. पाटील प्रा. डॉ. बडगुजर उपस्थितीत होते.

व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, प्रमुख वक्ते म्हणून यशवंत शितोळे उपस्थित होते.

करिअर कट्टा (Career Katta) च्या आयोजनामगील हेतू आणि उद्देश उच्च शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील, तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा स्पर्धा परीक्षा मधील (Competitive examination) उत्तीर्ण होण्याची टक्केवारी वाढवावी असा आहे असे प्रतिपादन प्रा. बी. सी. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात नमुद केले.

प्रमुख मान्यवर यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टा चे स्वरुप वैशिष्ट्य आणि गरज समजावून सांगताना बरेच संदर्भ दिले.

आजतागायत कट्ट्यावर चर्चिले गेलेले म्हणजे कट्यावर हजर नसलेल्या मित्र मैत्रिणींचे विषय,काल सिरियल मधे घडलेल्या घटना, मित्र मैत्रिणींचे ब्रेक अप असे पारंपरिक विषय (Traditional topics) बदलून स्पर्धा परीक्षा व उद्योग क्षेत्रातील झपाट्याने होणारे बदल लक्षात घेऊन ते विषय कट्यावर आणण्यासाठी करियर कट्याचे (Career Katta)आयोजन असून यातून राबविण्यात आलेल्या उपक्रमात आठवड्यातून तीनदा आय ए एस/ आय पी एस आपल्या भेटीला आणि उर्वरित दिवसात उद्योजक आपल्या भेटीला अशा अभिनव उपक्रमांसोबतच यु पी एस सी आणि एम पी एस सी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव म्हणजे जवळपास वर्षभराचे व्यस्त नियोजन या करियर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर (Career ) पर्यत नेऊन ठेवते असेही त्यांनी नमूद केले.

युद्ध हरल्यानंतर पराभूत सैनिक सुखरुप कसे परत येईल याचा आधीच विचार करणारा शुरसम्राट सेनापती नेपोलियन बोनापार्ट (Napoleon Bonaparte) यांचं उदाहरण देवून प्लॅन बी ची तयारी कशी करावी या बद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केले.

लाथ मारेल तिथं पाणी काढेल असं तरुणांबद्दल बोललं जातं पण जळगाव चा तरुण जिथं पाणी असेल तिथंच लाथ मारतो असे छोटेखानी विनोद साधत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाचा समारोप केला

महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ एन. जे. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अभ्यासक्रमात असलेले सगळेच विषय महत्त्वाचे असतात म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा विषय (Favorite topic) निवडून करियरचा मार्ग शोधला पाहिजे, स्वताची पात्रता ओळखून विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने योजना आखून बी प्लॅन देखील डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि या सगळ्या बाबी अधिक स्पष्टपणे समजून घ्यायच्या असतील तर करियर कट्टा (Career Katta) हे एक उत्तम माध्यम असल्याचंही त्यांनी सांगितले.

सुत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन प्रा रविकांत मुंडे यांनी केले.

या प्रसंगी उपप्राचार्य प्रा राजेंद्र देशमुख,प्रा. आर बी देशमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com