‘ऑनलाईन कॉमन योग प्रोटोकॉल’ शिबिराचे आयोजन

शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत भोळे महाविद्यालयात आभासी उद्घाटन
 ‘ऑनलाईन कॉमन योग प्रोटोकॉल’ शिबिराचे आयोजन

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी -

येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयातील (Dadasaheb Devidas Namdev Bhole College) शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत २१ जून आंतरराष्ट्रीय योग (International Yoga Day) दिनानिमित्त ‘ऑनलाईन कॉमन योग प्रोटोकॉल’ शिबिराचे (Online Common Yoga Protocol's Camp) आयोजन दि.७ ते २१ जून २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

दि.७ जून २०२२ रोजी सकाळी ७ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी. फालक यांचे हस्ते आभासी उद्घाटन करण्यात आले.

प्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी. फालक यांनी मार्गदर्शनात सांगितले की, शरीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी योग हा जीवनाचा अविभाज्य घटक बनविला पाहिजे, योगाच्या विशिष्ट आसनाच्या माध्यमातून विविध शारीरिक व्याधी बर्‍या करण्यासाठी प्राचीन काळापासून उपयोग होत आहे, योग कार्यशाळेचा उपयोग सर्व साधकांना निश्चितच होईल त्यांनी त्यांनी दररोज नियमितपणे योग व व्यायामाचा सराव (Practice yoga and exercise) सुरू ठेवावा योग ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे सांगितले
प्रमुख पाहुणे योग तज्ञ देवेंद्र पाटील यांनी मेडीटेशनचे (Meditation) महत्त्व विषद केले. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी कॉमन योग प्रोटोकॉल (Common Yoga Protocol) कसा बनवला याबद्दल मार्गदर्शन केले. दररोज सकाळी १ तास योगासने, प्रणायम, ध्यान केल्याने दिवसभर स्फुर्ती मिळते व कार्य क्षमता वाढते सर्वांनी पंधरा दिवस नियमित शिबिरात सहभाग घेऊन आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. तसेच डॉ.सीमा देवेंद्र यांनी झूम ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन योग शिबिरात प्रथमतः प्रार्थना, ओंकार, सूक्ष्म व्यायामाद्वारे शारीरिक हालचाली व विविध योगासने, (various yogas) ध्यान, प्राणायाम शिकविले व त्यापासून होणारे फायदे विविध आजारापासून कसा बचाव करता येईल याचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केली. सूत्रसंचालन डॉ.सीमा देवेंद्र तर आभार प्रा.अनिल सावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, मित्र परिवार यांनी सहभाग नोंदविला. यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.आर.पी. फालक तसेच क्रीडा समिती सदस्य व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी सहभाग नोंदवून सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com