
जळगाव - jalgaon
जिल्हा क्रीडा कार्यालय (District Sports Office), जळगाव जिल्हा (Mallakhamb Association) मल्लखांब असोसिएशन व भाऊसाहेब राऊत विद्यालय (Bhausaheb Raut Vidyalaya) जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक मल्लखांब दिनानिमित्त जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन दि.१९ जून रविवार रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (Chhatrapati Shri Shivaji Maharaj District Sports Complex) जळगाव येथे करण्यात आले आहे.
चार वयोगटात होणाऱ्या या स्पर्धेत मुलांसाठी पुरलेला मल्लखांब तर मुलींसाठी रोप मल्लखांब वर स्पर्धा घेण्यात येतील.
प्रत्येक गटातील प्रथम तीन विजयी स्पर्धकांना चषक व प्राविण्य प्रमाणपत्र तर सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रवेशासाठी जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे वरिष्ठ सहसचिव नरेंद्र भोई सर ९४२०३८९६७३ यांना संपर्क साधावा व जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे व जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, सचिव किशोर पाटील यांनी केले आहे.