जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव - jalgaon

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे (Democracy Day) आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ३ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील नागरीकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com