बनावट कागदपत्राव्दारे पुरस्कार लाटणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

डॉ. प्रदीप तळवेलकरसह 8 जणांचा समावेश
बनावट कागदपत्राव्दारे पुरस्कार लाटणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

श्री शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार (Shri Shiv Chhatrapati Sports Organizer Award) सन 2016-17 या वर्षाचा जळगावच्या ला.ना. सार्वजनिक हायस्कूलमधील (La. Na. public high school) निवृत्त क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवेलकर (Retired sports teacher Dr. Pradeep Talvelkar) यांच्यासह इतर आठ (Eight people) जणांनी बनावट कागदपत्राद्वारे (forged document) पुरस्कार लाटल्याप्रकरणी (case of forfeiture of awards) गुन्हा दाखल (Filed a case) करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (Order Additional District and Sessions Judge) जयदीप मोहिते यांनी जिल्हापेठ पोलिसांना दिले आहे.

बनावट कागदपत्राव्दारे पुरस्कार लाटणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
जळगाव जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांवर महिलाराज

क्रीडा संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या मदतीने व संगनमत करून खोटे व बोगस प्रमाणपत्र जोडून ,ते पत्रे खरी असल्याचे भासवून शासनाची दिशाभूल केली होती. या प्रकरणी फारुख शेख यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्यांनी ती नोंदवून घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

बनावट कागदपत्राव्दारे पुरस्कार लाटणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'
बनावट कागदपत्राव्दारे पुरस्कार लाटणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

प्रथम वर्ग न्यायालयाने तक्रारदाराची याचिका फेटाळली होती. या प्रकरणी पुन्हा तक्रारदाराने या बाबतची फेरविचार याचिका जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली होती. त्या तक्रारीची सुनावणी होवून डॉ. प्रदिप तळवेलकर यांच्यासह ला.ना. हायस्कूलचे क्रीडा शिक्षक प्रशांत जगताप, मारवड (ता.अमळनेर) येथील पाटील आर्ट्स कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. देवदत्त पाटील, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा.आसिफ खान अजमल खान, बाहेरील जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य आट्यापाट्याचे सचिव नागपूरचे डॉ.डी. पी. खिवसरा, महाराष्ट्र राज्य तलवारबाजीचे माजी सचिव नाशिक अशोक दुधारे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी सचिव औरंगाबादचे डॉ. उदय डोंगरे, आट्यापाट्या फेडरेशनचे सचिव नागपूरचे डॉ.ए. एम. पाटील, सॉफ्टबॉल इंडियाचे जनरल सेक्रेटरी इंदोर येथील एल.आर.मौर्य यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित झालेले आहे.

बनावट कागदपत्राव्दारे पुरस्कार लाटणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com