जिल्ह्यातील शिक्षकाचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश

आज प्रमाणपत्र सादर करण्याचा शेवटचा दिवस
जिल्ह्यातील शिक्षकाचे टीईटी प्रमाणपत्र तपासण्याचे आदेश

जळगाव : jalgaon

राज्यभरात टीईटी परिक्षेत (TET exam) पास होण्यासाठी झालेल्या घोटाळ्यात (scam) राज्यस्तरावर अनेक बडे अधिकारी (Big officials) अडकले असुन या प्रकरणाची बिंग फुटल्यानंतर शासनाने (Government) राज्यात २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांचे (Teacher's) टिईटी प्रमाणपत्र (TET Certificate) तपासणीचे आदेश (Inspection Order) जारी केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभागाकडून (Primary Education Department) प्रत्येक शाळा मुख्यध्यापकांना (headmaster) पत्र पाठवून संबधीत शिक्षकांचे टीईटी प्रमाणपत्र दि.५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहे.

ज्या शाळेमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत शिक्षक रूजू झाले आहे.त्या शिक्षकांना कार्यालयाकडून वैयक्तिक मान्यता प्रदान करण्यात आल्या आहे. अशा शिक्षकांनी दि.५ पर्यंत टीईटीचे मुळ प्रमाणपत्र व वैयक्तिक मान्यता आदेशाची छायांकित प्रत कार्यालयास सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिले आहे.ज्या शिक्षकांनी प्रमाणपत्र व वैयक्तिक मान्यताची कागदपत्रे छाणणी साठी सादर केले नाही व हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com