व्हेंटीलेटर खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश

चौकशी समितीने तांत्रिक बाबीत प्रचंड तफावत असल्याचा अहवाल दिल्यानंतर
व्हेंटीलेटर खरेदी प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

निविदेमध्ये असलेले व्हेंटीलेटर्स ventilator purchase process व पुरवठादाराने पाठविलेले व्हेंटीलेटर यांच्या तांत्रिकबाबींमध्ये प्रचंड तफावत difference असल्याचा अहवाल Report चौकशी समितीने Inquiry Committee जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. त्या अहवालानुसार जिल्हाधिकार्‍यांनी Collector व्हेंटीलेटर खरेदीची प्रक्रियाच रद्द Canceled करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सकांना District Surgeon शुक्रवारी दिले.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून मोहाडी येथील महिला व बालरुग्णालयासाठी 30 व्हेंटिलेटर्सची खरेदी करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश भोळे यांनी माहितीच्या अधिकारातून या व्हेंटिलेटर्सची माहिती मागवली होती. यामध्ये रुग्णालयाने मागवलेले व्हेंटिलेटर्स आणि पुरवठादार कंपनी लक्ष्मी सर्जिक या कंपनीने पुरवठा केलेले व्हेंटिलेटर्स यांच्यात तफावत असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दिनेश भोळे यांनी केली होती. भोळे यांच्या तकक्रारीनतंर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले होते. त्यानुसार त्या कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. उल्हास तासखेडकर यांच्या नेतृत्वाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. वृषाली सरोदे, अभियंता इलियाज शेख, कनिष्ठ लिपिक दीपक साठे, फायबर सुंदरी कंपनीचे प्रतिनिधी एकनाथ काकडे आणि पुरवठादार श्रेयस कंपनीचे अभियंता अशोक ओठे या सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली होती.

समितीने दिला 20 पानी अहवाल

चौकशी समितीने प्रशासकीय कार्यप्रणाली, तांत्रिक बाबी आणि वित्तीय कार्यप्रणाली या मुद्द्यांवर समितीला चौकशी करायची होती. समितीने मंगळवारी हा 20 पानी अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांना सादर केला होता. तो अहवाल डॉ.चव्हाण यांनी बुधवारी तो जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांना सादर केला होता.

... म्हणून रद्द केली खरेदीची प्रक्रिया

जिल्हा रुग्णालयाने मागवलेले व पुरवठा करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स यांच्या तांत्रिक बाबीत प्रचंड तफावत असल्याचे चौकशी समितीला आढळून आले. तो मुद्दा समितीने अहवालात स्पष्टपणे नमूद केला आहे. तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले व्हेंटिलेटर्स नसतील तर ते स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर खरेदीची ही प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

तांत्रिक समितीकडून अहवाल प्राप्त झाला असून स्पेसीफिकेशन मध्ये मोठी तफावत असल्याचे आढळतेत्यानुसार खरेदी प्रक्रिया रद्द करणेबाबत जिल्हा शल्यचिकित्सक याना कळवले आहे.

अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com