भाजपाचे अड्डे बंद होणार असल्याने विद्यापीठ कायद्याला विरोध

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळेंचा आरोप; विद्यापीठावर ताशेरे
भाजपाचे अड्डे बंद होणार असल्याने विद्यापीठ कायद्याला विरोध
Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्य विद्यापीठ कायद्यात (State University Act) सुधारणा कायद्यामुळे शिक्षणाचा अड्डा होईल अशा प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहे. परंतु या कायद्यामुळे राज्यपालांचे (Governor) कुठलेही अधिकार (Rights) कमी होणार नसून उलटपक्षी भाजपचे सुरु असलेले अड्डे कमी होणार आहे. त्यामुळेच ते या विधेयकाला विरोध करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पत्रकार परिषदेत सिनेट सदस्य (Member of the Senate) तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे (Vishnu Bhangale) यांनी केला.

मंजूर झालेल्या नवीन विधेयकानुसार सरकारकडून कुलगुरूंच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. राज्यातील उच्च शिक्षणाच्या हितासाठी कुलगुरू हे अत्यंत महत्वाचे पद असते. त्यामुळे सरकार म्हणून राज्याच्या शैक्षणिक हिताचा आणि अमंलबजावणीचा विचार करणे आवश्यक आहे. गेल्या सात वर्षापासूर राज्यपालांनी आपले अधिकार वापरुन संघाच्या मंडळींना कुलगुरु पदावर बसविले. तसेच त्यांच्याकडून त्यांना हवी तशी कामे करुन घेतली असल्याचा आरोप देखील विष्णू भंगाळे यांनी केला. यावेळी अ‍ॅड. रवींद्र पाटील, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शाम तायडे, शिवराज पाटील, विराज कावडीया, अ‍ॅड. कुणाल पवार, मुकुंद सपकाळे यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठात भष्ट्राचार

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात देखील गेल्या 4 वर्षात कुलगुरूंना अशाच प्रकारे काम करण्यास भाग पाडून त्यांनी चुकीची कामे करीत भ्रष्टाचार केला. परंतु हे सहन न झाल्यामुळेच कार्यकाळ असूनही चारवर्षात डॉ. पी. पी. पाटील यांनी कुलगुरु पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान विद्यापीठात परीक्षा बिले, पदभरती, विविध ठेक्यांची बिले यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.

राज्यपालांनी विधेयकावर स्वाक्षरी करावी

प्र-कुलपती हे त्या-त्या सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीच राहणार असल्याने त्यातून फायदाच होईल. हे विधेयक मंजूर होवून राज्यपालांच्या स्वाक्षरी साठी त्यांच्याकडे गेले आहे. त्यामुळे या विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com