लवचिकता ठेवली तरच घटस्फोटाचे प्रमाण घटणार

पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे यांचे प्रतिपादन; धनगर समाजाच्या वधू-वर परिचय सुचीचे प्रकाशन
लवचिकता ठेवली तरच घटस्फोटाचे प्रमाण घटणार

जळगाव JALGAON । प्रतिनिधी

जोडीदाराचे (the spouse )विचार सारखे पाहिजे, अशी भूमिका न ठेवता विवाहेच्छूक (Willing to marry) युवक-युवतींनी (Young men and women) लवचिकता (Flexibility) ठेवली पाहिजे.तडजोडी स्वीकाल्या तरच पुढील काळातील घटस्फोटाचे (Divorce) प्रमाण कमी होईल. लग्नापूर्वी विवाह समुपदेशन आणि आपल्या अपेक्षांवर मुलामुलींसह पालकांनीदेखील संवाद केला पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे (Padma Shri K. Dr. Vikas Mahatme) यांनी केले.

मांगल्य वधू-वर सूचक व संकलन केंद्राचे संचालक प्रभाकर न्हाळदे,संचालिका रेखा न्हाळदे यांच्या संयोजनातून केंद्रातर्फे व.वा.वाचनालय येथे रविवारी 26 वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री खा.डॉ.विकास महात्मे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार राजूमामा भोळे, सेवानिवृत्त डीवायएसपी केशव पातोंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले, रघुनाथ सोनवणे, रामेश्वर पाटील, सुभाष सोनवणे,अमरावतीचे राहुल थेटे उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्याहस्ते पूजन झाले. त्यानंतर राज्यस्तरीय वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन धर्मा सोनवणे, अशोक पारधी यांनी तर आभार गणेश बागूल यांनी मानले.

22 विवाह जुळले

या मेळाव्यात धनगर समाजातील सर्व पोटजातींच्या मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून परिचय दिला. यावेळी वधू-वर केंद्राच्या माध्यमातून 22 युवक-युवतींचे विवाह जुळले. युवक व युवतींनी त्यांचा परिचय देऊन त्यांच्या अपेक्षा व त्यांच्याविषयी माहिती दिली. मेळाव्यात 150 विवाहेच्छूक युवक-युवतींनी परिचय करून दिला.आरक्षणासाठी आंदोलन

धनगर समाजाला आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. त्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे,असेही डॉ.महात्मे म्हणाले. या मेळाव्यासाठी रामचंद्र चर्‍हाटे,सुभाष करे,महेंद्र सोनवणे, अरुण ठाकरे, दिलीप धनगर, प्रवीण पवार, सुनील खोमणे, डॉ.संजय पाटील, दिगंबर धनगर, संदीप मनोरे, संदीप तेले, हिलाल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com