चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री

धक्कादायक प्रकार उघड : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; गुन्हा दाखल
चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (Doctor's note) मेशो (Mesho) या ऑनलाईन पोर्टलवरुन (Online portal) गर्भपाताची ऑनलाईन औषध विक्री (Online abortion drug sales) होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) कारवाई केली असून मेशो आणि औषधींचा पुरवठा करणा-या एस.एस.ट्रेडर्स (साऊथ दिल्ली) या संस्थेविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या तक्रारीवरुन गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (Doctor's note) गर्भपाताच्या औषधी (abortion drug sales) विक्रीवर शासनाने निर्बंध घातले आहे. मेशो या शॉपिंग अ‍ॅपवर सर्रासपणे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या औषधांची विक्री (Sale of drugs) होत असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. ऑनलाईन वरून गर्भपातासाठीच्या औषधांचा पुरवठा झाल्यास त्याचा दुरूपयोग होऊन महिलांच्या जिवीतास धोका (Danger to women's lives) निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याची पडताळणी करण्याची सूचना अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) आयुक्त यांनी केली होती. त्यानुसार जळगाव अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ मुळे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने रजिस्टर मेशो या अ‍ॅपवर दि.29 मार्च रोजी गर्भपाताच्या औषधांची मागणी नोंदविली.

तरी सुद्धा केली जात होती विक्री

गर्भपाताचे औषध हे औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 अंतर्गत शेड्यूल एच प्रवर्गातील असून त्याची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (Doctor's note) करू नये अशा सूचना असतना सुध्दा तिची विक्री करण्यात आली असल्याचेही समोर आले आहे.

तज्ज्ञच देवू शकतात औषधी

गर्भपाताची औषधी (abortion drug) स्त्रीरोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व त्यांच्या शिफारसीनेच कायदेशीर गर्भपातासाठी वापरली जातात. तसेच स्त्रीभ्रुण हत्याबाब केंद्र व राज्य शासन यांनी नियमांच्या कठोर पालनाकरिता एमटीपी क्टर 2002 अन्वये कायदा केला असताना सुध्दा एस.एस.ट्रेडर्स व मेशो या संस्थांनी केलेले कृत्य गंभीर असल्याचे अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

डिलेव्हरी बॉयमार्फत मिळाली औषधी

ऑर्डर नोंदविल्यानंतर दि. 3 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता त्या औषधी डिलेवरी बॉय (Delivery Boy) मार्फत प्राप्त झाल्या. त्यानंतर मूळे यांनी औषधींचे बील तपासले असता, त्यांना ही औषधी मेशो अ‍ॅपमार्फत ए.एस.ट्रेडर्स, खिजराबाद, न्यू फ्रेंड्स कॉलनी, न्य लायन्स हॉस्पीटल, साऊथ दिल्ली यांनी विक्री केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते.

Related Stories

No stories found.