उमविच्या पदवी प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज

उमविच्या पदवी प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज

जळगाव jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) ३० व्या पदवीप्रदान (Degree conferred) समारंभात ज्या विद्यार्थ्यांना (students) पदवी/पदवीका प्रमाणपत्र (Degree / diploma certificate) घ्यावयाचे आहेत त्यांनी दि. ३० नोव्हेबर,२०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज (Apply online) सादर करावयाचे आहेत.

विद्यापीठातर्फे एप्रिल/मे-२०२१ व त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पीएच.डी. धारकांकरिता पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर Home Page वरील Student Corner- Examination- Convocation वर उपलब्ध आहे.

विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ११ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत आहे. उत्तीर्ण वर्षापासून पाचवर्षाच्या आत पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ३५०/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये १०००/- भरावे लागतील.

तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत दि.१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत आहे. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईन भरावे असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक डॉ.किशोर पवार यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.