बिअरच्या बाटलीने एकाचे डोके फोडले

बिअरच्या बाटलीने एकाचे डोके फोडले

वरणगाव फॅक्टरी, Varangaon Factory ता.भुसावळ । वार्ताहर

येथून जवळच असलेल्या हतनूर येथे एकास बिअरची बाटली (beer bottle) डोक्यात (smashed head) मारून जखमी गेल्याची घटना दि.20 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश पंडित तायडे (वय 41, रा.साकरी शिवार, निंभोरा ता.भुसावळ) हा लूमखेडा येथुन चुलतभाऊ सोपान देविदास तायडे सोबत हतनूर येथे गौरव हॉटेलवर जेवण करत असता दिलीप धनसिंग तायडे याने शिवीगाळ करून गणेशच्या डोक्यात बियरचे बाटली मारून जखमी केले. तसेच अन्य चार जणांनी गणेश यास खाली पडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यानंतर दिलीप यास त्याचा चुलतभाऊ सोपान तायडे याने वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले तेथे प्रथमोपचार उपचार केले. दिलीप यास डोक्यात टाके पडले असून खांद्यावर मुकामार सुद्धा लागलेला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गणेश तायडे यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि. 323, 504, 506, 510, 324, 143, 147, 148, 34 प्रमाणे दिलीप धनसिंग तायडे (रा.हतनूर), निवृत्ती मधुकर सपकाळे (रा.हतनूर), अमोल नामदेव डोळे (रा.गोजोरे), गणेश सोपान सपकाळे (रा.हतनूर), चुडामण सोपान सपकाळे (रा.हतनूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ मनोहर पाटील व पोलिस नाईक प्रमोद कंखरे करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी दुसरी फिर्याद दिलीप धनसिंग तायडे (वय 42, रा.पिंपरीसेकम) यांनी दिली. फिर्यादीत त्यांनी हतनूर गावी जत्रा असल्याने सोपान सपकाळे, निवृत्ती सपकाळे, गणेश सोपान सपकाळे जत्रेला गेले होते. ते संध्याकाळी हॉटेल गौरव येथे जेवणासाठी गेले असता त्यांना सोपान देविदास तायडे याने निवडणुकीच्या विषयावर अश्लील भाषा वापरून शिविगाळ केली तसेच गणेश पंडित तायडे यांनी कंठी पकडून मारहाण केली. तसेच सोपान तायडे याने दगड हातात घेऊन मारहाण करू लागल्याने दिलीप यांच्या डोक्यावर सुजन आली असून त्यांनी डॉ.भोईटे यांच्या दवाखान्यात उपचार केले. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला दिलीप तायडे यांच्या फिर्यादीवरून सोपान तायडे व गणेश पंडित तायडे (रा.साकरी शिवार निंभोरा) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com