खुनाच्या गुन्ह्यात एकास जन्मठेप

पूर्ववैमनस्यातून घडली होती घटना: भुसावळ न्यायालयाचा निकाल
खुनाच्या गुन्ह्यात एकास जन्मठेप

भुसावळ bhusawal (प्रतिनिधी) -

खुनाच्या गुन्ह्यात (Convicted of murder) दोषी (Guilty) आढळून आल्याने प्रल्हाद होलाराम सचदेव (Pralhad Holaram Sachdev) (रा. भुसावळ) याला येथिल जिल्हा सत्र न्यायालयाने ( District Sessions Court) जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीवरुन, आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव याने शहरातील पंचशील नगरमधील आनंद अशोक वाघमारे याचा ६ मे २०१८ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पुर्ववैमनस्यातून चाकूने भोसकले होते. यात आनंदचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत आनंदचा भाऊ चेतन वाघमारे याच्या फिर्यादीवरुन आरोपी प्रल्हाद सचदेव याच्या विरुद्ध भा. दं. वी. कलम ३०२ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

या खटल्याची सुनावणणी येथिल जिल्हा सत्र न्याल २ आर. एम. जाधव याच्या न्यायालयात झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार तपाण्यात आले होते. मयाताचा भाऊ फिर्यादी चेतन वाघमारे, हसन तडवी, प्रकाश गायकवाड, डॉ. एन. ए.देवराज यांची साक्ष महतत्वपूर्ण ठरली.

या खटल्याची अंतिम सुनावणी ११ रोजी झाली त्यात जन्म ठेपेची व रू. २ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास १ महिना. साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खडल्यात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभयोक्ता प्रविण पी. भोंबे यांनी काम पाहिले. आरोपी तर्फे ऍड. अकील इस्माईल तर तपसाधिकरी पीएसआय अनिस शेख आणि पैरवी अधिकारी म्हणून सहा. फौजदार समिना तडवी व केसवॉच गयास शेख यांनी काम केले. आरोपीवर यापूर्वी देखील ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Related Stories

No stories found.