एक गाव एक गणपती उत्सवातील सर्व उपक्रम प्रेरणादायी

आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केले विचार.
एक गाव एक गणपती उत्सवातील सर्व उपक्रम  प्रेरणादायी
Ganpati Bappa

एरंडोल (Erandol) (वार्ताहार) -

शहराने यावर्षी कोरोना या संकटामुळे एक गाव एक गणपतीची स्थापना करून एक आदर्श निर्माण केला उत्सवात साजरे केलेले सर्व उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत आमदार चिमणराव पाटील (MLA Chimanrao Patil) यांनी व्यक्त केले .

शहरात गणेश उत्सव दर वर्षी फार मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा होतो. परंतु यावर्षी कोरोना चे संकट लक्षात घेता गणेश मंडळ व पोलिस प्रशासनाच्या सहकार्या ने यावर्षी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून वृक्षरोपण, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबिर , दाही दिवसात विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे. असे आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी त्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धा प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या उत्तेजनार्थ असे प्रशस्तिपत्र व शील्ड देऊन सन्मान करण्यात आला. कबड्डी स्पर्धेचे सराव करणाऱ्या युवकांनाही साहित्य देण्यात आले त्यापूर्वी आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते आरती करण्यात आली. सदर उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस प्रशासन व गणेश भक्त तर्फे राबवण्यात आलेल्या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले.

सदरची उपक्रम हे शहरवासी यांच्या व गणेश भक्तांच्या सहकार्या मुळेच शक्य झाल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी व्यक्त केले व त्यांनी या वेळेस सर्व गणेशभक्त व गणेश मंडळांचे ही आभार मानले.

यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, माजी नगराध्यक्ष भारती ताई रविंद्र महाजन, संजय गांधी समितीचे सदस्य आनंदा चौधरी भगत, नगरसेवक कुणाल महाजन, अतुल महाजन, परेश बिर्ला, अमोल भावसार, चिंतामण पाटील, एक गाव एक गणपती चे अध्यक्ष मनोज ठाकूर, पियुष चौधरी, राजेंद्र महाजन, पियुष चौधरी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय चौधरी, राज पाटील, कुणाल पाटील, यांच्यासह असंख्य नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल संदीप सातपुते अनिल पाटील अखिल मुजावर मिलिंद कुमावत लोहार श्रीराम पाटीलसर्व पोलीसकर्मचारीव गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com