कारवरील ताबा सुटल्याने एक जण ठार

Accident
Accident

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील आडगाव शिवारात Adgaon Shivara चाळीसगाव-मालेगाव रोडवर मालेगावाहून चाळीसगावकडे येणार्‍या भरधाव कारवरील (इंडिगो) ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात In an accident एक जण जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला Chalisgaon Rural Police Stationनोंद करण्यात आली आहे.

मालेगावाहून चाळीसगावच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना अचानक इंडीगो गाडीवरील (क्र. एम.एच.४७ जी. ७०४४) चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन डांबरी रस्त्याच्याखाली जाऊन उलटल्याने झालेल्या अपघातात ताहेर युसूफ पटेल (५५) रा. मालेगाव याचा जागीच दुदैवी मृत्यू झाला. चालक कामरान खान नहीमखान रा. दयाणे ता. मालेगाव हा गंभीर जखमी झाला आहे.

हि घटना रविवारी रात्री १ वाजेच्या सुमारास आडगावजवळील फौजी हॉटेलसमोर घडली . याप्रकरणी आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात भादवि कलम- ३०४(अ), २७९, ३३७, २२७ व मोटार अधिनियम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुभाष पाटील करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com