बस-मोटर सायकल अपघातात एक जण ठार

बस-मोटर सायकल अपघातात एक जण ठार

रावेर|प्रतिनिधी - raver

अजंदा (ता.रावेर) येथील ३५ वर्षीय व्यक्तीचा बस अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी धामोडी गावाजवळ घडली. बबन भाऊराव पाटील वय -३५ हे मयत झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. ते कामानिमित्त धामोडी गावाहून कांडवेल गावाकडे मोटार सायकलवरून जात असतांना एसटी बसच्या धडकेने झालेल्या अपघातात त्यांचा मुत्यू झाला आहे.

याबाबत घटनेची माहिती मिळताच अजंदा येथील नागरिकांची प्रचंड गर्दी ग्रामीण रुग्णालयात जमली होती. त्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com