ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने फरकांडे रस्त्यावर एकाचा मृत्यू

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने फरकांडे रस्त्यावर एकाचा मृत्यू

कासोदा, Kasoda तालुका एरंडोल

कासोदा  फरकांडे ( Kasoda Farkande) रस्त्यावर (road) विटांनी  भरलेला ट्रॅक्टर (tractor) जात होता. ट्रॅक्टर वरून दोरी लोबंकळत (rope is twisted) होती. ति दोरी ओढत असताना (pulling the rope) तोल (balance) जाऊन चाका खाली (wheel down) आल्याने एकाचा मृत्यू (death of one) झाला.

सकाळी  विटांनी भरलेला ट्रॅक्टर  फरकांडे रस्त्यावरून जात असताना, त्यावर बसलेला राहुल कुंभार ( वय 22 ) याने ट्रॅक्टर खाली लोबंकळत असलेली दोरी ओढण्याचा प्रयत्न केला, त्यात तो खाली पडला. त्याच्या अंगावरून  ट्रॅक्टरचे चाक गेले. त्यात तो जखमी झाला. सदर घटना ही फरकांडे रस्त्यावरील जानफळ गावाजवळ झाली. जखमी राहुल ला एरंडोल रुग्णालयात पाठवले असता तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. 

     सदर घटनेची फिर्याद ट्रॅक्टर चालक विनोद सोनू कुंभार याने कासोदा पोलीस स्टेशनला दिली.  त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, कासोदा पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय कायटे मॅडम यांच्या मार्गदर्शनात ,पोलीस कॉन्स्टेबल कोळी, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव घुले पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com