ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल
ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Accident

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

तालुक्यातील हातले येथील दुचाकी चालकास (Two-wheeler ) समोरुन येणार्‍या भरधाव ट्रॅक्टरने (tractor) धडक (Hit) दिल्याने, त्यांच्या जागेवरच मृत्यू (Death) झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हि घटना दि,९ रोजी घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस (police) स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

Accident
पुत्र वियोगाचा, शोक अनावर झाला, मातेनेही आपुला, प्राण मग त्यागला.!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत मुलचंद मखलाला जाधव रा.हातले यांच्यासह नारायण रतन पवार, छोटु माहदु पांचाळ हे तिघे दुचाकीने (Two-wheeler ) (क्र.एमएमच १९, डीई ९५३५) ने हाताळे गावकडून चाळीसगावकडे येत असताना, चाळीसगावकडून हाताळे गावाकडे जाणार्‍या भरधाव ट्रॅक्टरने (tractor) (क्र.एमएम,एपी,५७१५) वरील चालकाने दुचाकीस जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात (accident) मुलचंद जाधव यांचा मृत्यू (Death) झाला.

तर नारायण रतन पवार, छोटु माहदु पांचाळ हे गंभीर जखमी झाले. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भाऊसिंग सदाशिव जाधव रा.हातले यांच्या फिर्यादीवर ट्रॅक्टर अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.