शेतात वीज पडल्याने एक ठार, दोन जण जखमी

उचंदा गावावर शोककळा
शेतात वीज पडल्याने एक ठार, दोन जण जखमी

पुरनाड Purnad ता मुक्ताईनगर वार्ताहार

येथून जवळच असलेल्या उचंदे शेती शिवारात (Farming in Shivara) वीज पडल्याने (due to lightning) एक तरुण ठार (young man killed) तर दोन तरुण जखमी (wounded) झाल्याची घटना आज मंगळवार रोजी दुपारी पावणे तीनच्या वाजेच्या सुमारास घटना घडली.

उचंदे येथील माणिक जगन्नाथ पाटील यांच्या शेतात आज काम सुरू असतांना दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने मुकेश अशोक पाटील (वय ३३ ) ,गणेश माणिक पाटील (वय ३४) आणि शत्रुघन काशीनाथ धनगर (वय ३५) हे तिघे जवळच्या निंबाच्या झाडाखाली उभे होते.ज्या झाडाखाली हे तिघे उभे होते त्याच झाडावर वीज कोसळली.यात शत्रुघन धनगर यांच्या अंगावर वीज पडल्याने ते ठार झाले तर मुकेश पाटील आणि गणेश पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.तिघे तरुण शेतकरी कुटुंबातील आहेत.

यातील एका तरुणावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.तर दुसऱ्यावर मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

      या दुर्दैवी घटनेने उचंदा गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com