Accident टाटा मॅजिकच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

Accident टाटा मॅजिकच्या धडकेने दुचाकीस्वार  जागीच ठार

रावेर|प्रतिनिधी raver

पालजवळील मोरव्हाल फाट्यावर (mp) मध्यप्रदेशातून पालकडे येणाऱ्या (Two-wheeler) दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने,या अपघातात (accident) मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला आहे.

नानकराम फुलसिंग भिलाला (वय-२३) रा.बिलखेड म.प्र. हा मोटार सायकल क्रमांक एम पी १० जि.०९९० यावरून मोरव्हालकडून पालकडे येत असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा मॅजिक (Tata Magic) गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाला तर ललित चव्हाण वय-३५ हा गंभीर जखमी झाला आहे.

टाटा मॅजिकचा चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत जखमी ललित चव्हाणला पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.जखमी ललित चव्हाणला पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मयताचे शवविच्छेदन करण्यासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.पुढील तपास (police) पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी प्रदीप सपकाळे, कल्पेश आमोदकर, संजय मेढे हे करीत आहे. मयत हा गुटखा विक्रीसाठी आणत असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com