मोटारसायकली एकमेकांवर आदळल्याने एकाचा मृत्यू

चाळीसगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
मोटारसायकली एकमेकांवर आदळल्याने एकाचा मृत्यू

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव-भडगाव (bhadgaon) रस्त्यावरील (Ozar) ओझर ते पातोंडा दरम्यान वानरदेव मंदिराजवळील रस्त्यावर पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात मोटारसायकलस्वाराने दुसर्‍या मोटारसायकलीस समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलीवरुन चाळीसगांवकडे येणार्‍या स्टेट बँकेतील कर्जविभागात अधिकार्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री आठ वाजेच्या सुमारांस घडली आहे. या प्रकरणी चाळीसगांव शहर (police) पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

या घटनेतील दुसरा मोटारसायकलस्वार हा उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला असल्याचे समजले आहे. मयताचे नाव ऋषीकेश दत्तात्रय चंद्रात्रे (वय-३७) रा.औरंगाबाद, ह.मु. चाळीसगाव हे चाळीसगांव येथील स्टेट बँकेत कर्ज विभागात नोकरीला असून ते काल पाचोरा येथून चाळीसगांवकडे येत असतांना समोरुन येणार्‍या मोटारसायकलची समोरासमोर धडक बसली. धडक इतकी जोदार होती की, या अपघातात ऋषीकेश दत्तात्रय चंद्रात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा मोटारसायकल स्वारास देखील जबर मार लागला असून तो प्रेमसिंग रतनसिंग परदेशी (रा. बांबरुड) येथील रहिवाशी असल्याचे समजते. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हां दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com