वढोदे गावाजवळ मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू

देशदुतचे पत्रकार चंद्रकांत नेवे यांचे जेष्ठ बंधु
वढोदे गावाजवळ मोटारसायकलच्या अपघातात एकाचा मृत्यू

यावल Yaval ( प्रतिनिधी )

यावल चोपडा मार्गावरील वढोदे (Vadodara) गावाजवळ मोटरसायकलचा अपघात (motorcycle accident) होवुन एक जण गंभीर जखमी (Seriously injured) झाल्याची घटना घडली असुन , गंभीर अवस्थेत जखमी असलेल्या अशोक पद्दमाकर नेवे यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात (private hospital) दाखल करण्यात आले असता ते मरण (Death) पावल्याचे वृत्त आहे .

या संदर्भातीत वृत्त असे की आज दिनांक ४ जुलै रोजी सायंकाळी ६,३oते ७ वाजेच्या सुमारास अशोक पद्दमाकर नेवे ,वय ५४ वर्ष (राहणार साकळी) तालुका यावल हे यावल येथुन आपले व्यवसायीक काम आटोपुन आपल्या एमएच १९ डी एक्स५४८२ या मोटरसायकलने साकळी गावी जात असतांना यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ अचानक त्यांच्या ताब्यातील मोटरसायकली वरून अशोक नेवे हे खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. नागरीकांच्या मदतीने अशोक नेवे यांना तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ बी बी बारेला त्यांच्या आरोग्य कर्मचारी यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. नेवे यांची प्रकृती ही अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले असता त्यांचा मृत्यु झाला.

अशोक नेवे हे साकळी येथील देशदुतचे पत्रकार चंद्रकांत नेवे यांचे जेष्ठ बंधु होते .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com