दहिगाव विरावली रस्त्यावर रिक्षा उलटून एक ठार

दहिगाव विरावली रस्त्यावर रिक्षा उलटून एक ठार

दहिगाव Dahigaon ता. यावल.

येथून जवळच असलेल्या यावल  विरावली रस्त्यावर (Dahigaon Wiravali road) सायंकाळी ४  वाजेचे सुमारास  विरावली गावातून जळगाव जाण्यासाठी  एम एच १९ बीजे ८९४१ या क्रमांकाच्या    ऑटो रिक्षा (rickshaw) ने  प्रवास करित असताना  विरावली ते यावल दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने   ऑटो रिक्षा  रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडून पलटी (overturns) होऊन दोन जखमी व एक ठार (One killed) झाल्याची घटना घडली.

जखमींना उपचारासाठी  यावल येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र  सेवानिवृत्त शिक्षण विभाग अधीक्षक दस्तगीर सबाज तडवी विरावली  ह. मु.  जळगाव  यांना जबर मार लागल्याने त्यांना  जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय   रूग्णालयात उपचारासाठी दाखल कारीत असताना रस्त्यातच त्यांची  प्राणज्योत मावळली.

सदर अपघातग्रस्त ऑटो रिक्षा जागेवरून पसार झाल्याने मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून मृत्यू संदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे. सदर प्रकरणी चौकशी होऊन  रिक्षा मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाइकांकडून करण्यात येत आहे, 

मयत दस्तगीर सबाज तडवी हे हिंगोली जिल्हा आरटीओ आशिफ तडवी यांचे वडिल आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com