दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगावाहून भरधाव वेगाने जाणार्‍या मालवाहू गाडीच्या धडकेत (accident) दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहरातील (Ozar) ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी (police) पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

चाळीसगावाहून भडगावकडे भरधाव वेगाने जाणार्या छोटा हत्ती या मालवाहू गाडीच्या (क्र. एम.एच.१९ सीवाय ५८२५) धडकेत दुचाकीस्वार (क्र.एम.एच.१९ सीएस ४३५६ ) जागीच ठार झाल्याची घटना काल सायंकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास शहरातील ओझर ते पातोंडा रस्त्यावर घडली आहे.

या भिषण अपघातात पितांबर आनंदा पाटील (वय-६३) रा. बोरखेडा ता. चाळीसगाव याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटना घडताच छोटा हत्तीवरील अज्ञात चालक (नाव गाव माहीत नाही) पसार झाला. याप्रकरणी अनिल दयाराम पाटील रा. बोरखेडा यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ४२७, १८४ व १३४(ब) प्रमाणे रात्री उशिराने अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com