वलठाण धरणात बुडून एकाचा मृत्यू

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद
वलठाण धरणात बुडून एकाचा मृत्यू
जव्हार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील वलठाण धरणात पिंपरखेड येथील एका ४५ वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रघु विठ्ठल पवार(४५) रा.पिंपखेड यांचा मृतदेह आज(दि,२९) दुपारी ४ वाजेच्या पूर्वी वलठाण धरणात मिळुन आला. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.