गिरणा नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

तिघे बचावले; शोधकार्य सुरु
गिरणा नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

जळगाव- jalgaon

धरणगाव तालुक्यातील बांभोरी जवळील भोकणी गावाजवळील (Bhokani village) गिरणा नदीपात्रात (Girna river basin) पोहण्यासाठी (swim) गेलेले चार तरुण बुडाल्याची (Four youths drowned) घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत तीन तरुणांना वाचविण्यात (saving) गावकऱ्यांना यश आले असून विशाल हिलाल जोहरे (वय-१६) हा बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील यश पप्पु भालेराव (वय १४), प्रेम परशुराम झांझळ (वय १५), मुयर संतोष सपकाळे (वय १५, रा. शिवाजी नगर) व विशाल हिलाल जोहरे (वय १६) हे चौघे तरुण शनिवारी दुपारच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील भोकणी गावाजवळील गिरणा नदीत पोहायला गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघे जण बुडायला लागले. हा प्रकार नदीकाठवर असलेल्या काही ग्रामस्थाच्या लक्षात आला.

त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत यश, परशुराम व प्रेम या तिघांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु तो पर्यंत विशाल पाण्यात बेपत्ता झाला होता. घटनेची माहिती मिळताच पाळधी दुरक्षेत्रचे पोलीस अंमलदार गजानन महाजन, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदणकर, प्रवीण सुरवाडे, तालुका पोलिस ठाण्याचे संजय भालेराव यांच्यासह तहसिल व अग्निशमन विभागाचे लोक घटनास्थळी दाखल झाले. परंतु रात्री उशिरापर्यंत पाण्यात शोधकार्य सुरू होते मात्र पाण्यात बेपत्ता झालेला विशाल मिळुन आला नाही.

कुटुंबीय घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच विशालसह इतर तरुणाच्या कुटंुबीयांनी घटनास्थळी दाखल झाले होते. अंधारामुळे शोधमोहिम थांबवण्यात आली. होती त्यानंतर उद्या रविवारी पुन्हा शोध मोहीम राबवून विशालचा शोध घेतला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com