अभय योजनेअंतर्गत चार दिवसात एक कोटींची वसुली

थकबाकी धारकांसाठी मनपाची योजना
अभय योजनेअंतर्गत चार दिवसात एक कोटींची वसुली

जळगाव |jalgaon

शहरातील थकबाकी धारकांना (arrears holders) शास्तीत सुट देण्यासाठी (Exemption from punishment) मनपा प्रशासनाने (Municipal administration) अभय योजना (Abhay Yojana) लागू केली आहे.

या योजनेअंतर्गत चार दिवसांत १ कोटी ६९ हजार रुपयांची वसूली झाली आहे. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये २७ लाख ७६ हजार ६६३ रुपये, प्रभाग क्र. २ मध्ये २० लाख १४ हजार ८४९ रुपये, प्रभाग क्र. ३ मध्ये ३० लाख ५६ हजार ७३० तर प्रभाग क्र. ४ मध्ये २२ लाख २० हजार ८०३ रुपयांची वसूली झाल्याची माहिती उपायुक्त प्रशांत पाटील (Deputy Commissioner Prashant Patil) यांनी दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com