यावलमध्ये एकाची गळफास घेवून आत्महत्या

यावलमध्ये एकाची गळफास घेवून आत्महत्या

यावल Yaval प्रतिनिधी

शहरातील धनगरवाडा (Dhangarwada) परिसरातील एका व्यक्तीने (one person) गळफास (hanging) घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात (Yaval police station) घटनेची नोंद करण्यात  आली आहे.

येथील शहरातील धनगरवाडा परिसरात राहणारे राजेंद्र गंगाधर कचरे (वय ५२ वर्ष) धंदा मजुरी हे आपल्या कुटुंबासह राहत असून ५ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शोभाबाई कचरे यांना जाग आली. त्यांना राजेन्द्र कचरे हे खाटेवर दिसले नाहीत.

त्यांचा शोध घेतला असता कचरे यांनी घरासमोरील धनगरवाडयातील स्वस्त धान्य दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसुन आले आहे .   

   या संदर्भातील मयत राजेन्द्र कचरे यांचा मुलगा धनराज राजेन्द्र कचरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे..

मयत राजेन्द्र कचरे यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन केले . घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . यावल तालुक्यातील आठवडयाभरातील आत्महत्या करण्याची ही पाचवी घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com