बेराेजगारी व सावकारी कर्जामूळे एकाची गळफास घेवून आत्महत्या

बेराेजगारी व सावकारी कर्जामूळे एकाची गळफास घेवून आत्महत्या

अमळनेर Amalner   प्रतिनिधी   

शहरात आज एका  व्यक्तीने (One committed) बेराेजगारी (unemployment) व आपल्यवर सावकारी कर्जामूळे (loan sharking) गळफास घेवून आत्महत्या (suicide) केली हि घटना दि १४ रोजी रात्री घडली आज दि १५ रोजी दोन जणांना अटक केली आहे. दिनेश पंजवाणी असे मयत तरूणाचे नाव आहे.

त्याच्या सूसाईट नोटमध्ये लिहिलेल्या चिट्टीत माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी आहे, माझ्या मित्रानो आपण शक्य तेवढी मदत करावी, अशा भावनिक शब्दात चिठ्ठी लिहून बेरोजगार  इसमाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पैशाचा तगादा लावणाऱ्या दोन जणांची नावे देखील त्याने चिट्ठीत लिहिल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. तर जितेंद्र चौधरी  (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा. जानवे ता.अमळनेर) अशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावे आहेत.

दिनेश पंजवाणी याने लिहिलेल्या  चिट्ठीतील मजकूर असा "मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है...जितू चौधरी महेश सैंदाणे ये लोग मुझे  धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है ,ये दोनो को कहासे दु ,इसलिए तंग होकर  मैं आत्महत्या कर रहा हूँ. ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है....""

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com