अमळनेरात अडीच लाखाच्या गांजासह एकाला अटक

अमळनेरात अडीच लाखाच्या गांजासह एकाला अटक

अमळनेर Amalner

अमळनेर शहरात बस स्थानकाजवळ विक्रीसाठी आणलेला दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो गांजा (marijuana) अमळनेर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून पकडला असून त्यात एकाला पोलिसांनी (One arrested) ताब्यात घेतले असून एक जण फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

 22 रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास अमळनेर बस स्थानकाजवळ दोन जण गांजा आणणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली होती.त्यानुसार बसस्थानक परिसरात राधेश्याम रामसिंग पावरा व सुरेश साहेबराव भदाणे दोन्ही रा.हिसाळे ता.शिरपूर जि. धुळे हे एका पिशवीत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा १५ किलो ५६६ ग्रॅम गांजा सोबत पोलिसांना आढळून आले.

सुरेश साहेबराव भदाणे यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाण्यास यशस्वी झाला.तर राधेश्याम रामसिंग पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहायक  फौजदार राजेंद्र कोठावदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत. दि.23 रोजी आरोपीस अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.     

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com