चाळीसगाव येथे ४० हजारांच्या गांजासह एक ताब्यात

चाळीसगाव पोलिसांची कारवाई
चाळीसगाव येथे ४० हजारांच्या गांजासह एक ताब्यात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गांजा (ganja) विक्री करतांना एकाला (One arrested) पोलिसांनी (police) रंगेहात पकडले आहे. त्यांच्या ताब्यातून ४३ हजार ९०० रुपये किमतीच्या २ किलो २२८ ग्रँम गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

आरोपी जगदीश जगन्नाथ महाजन (वय ५२ वर्षे) रा.नेताजी चौक, चाळीसगांव. हा चाळीसगांव शहरामध्ये अवैध रित्या गांजा विक्री करित असल्याची गुप्त माहीती पो.नि.संदिप पाटील यांना मिळाल्याने. त्यांनी पोलीस अधिक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे तसेच सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांची परवानगी घेवुन, पोलीस निरीक्षक, संदिप पाटील तसेच नायब तहसिलदार विकास लाडवंजारी, सपोनि, सागर ढिकले, पोहेकॉ योगेश बेलदार, नितीश वासुदेव पाटील, पोना. सुभाष घोडेस्वार, पोना. पंढरीनाथ पवार, वनोद विठ्ठल भोई, दिपक प्रभाकर पाटील, भटु पाटील, राहुल सोनवणे, प्रविण जाधव, विनोद खैरनार, निलेश पाटील, अमोल युवराज भोसले, रविंद्र निंबा बच्छे, संदिप बाळासाहेब पाटील, नंदकिशोर शिवराम महाजन, आशुतोष दिलीप सोनवणे, नरेंद्र किशोर चौधरी तसेच फोटोग्राफर गोपाल विठ्ठल चितोडकर, वजन माप करणारे निलेश सोमनाथ सराफ आदिच्या पथकाने छापा टाकूण जगदीश जगन्नाथ महाजन याला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ४३ हजार ९०० रुपये किमतीच्या २ किलो २२८ ग्रँम गांजासह मिळुन आला. याप्रकरणी चाळीसगाल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक, सुहास आव्हाड व पोकॉउज्वलकुमार म्हस्के नेम हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com