खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी, दीड पट भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट

पुणे-धारणी असे दोन हजार भाडे आकारणी करून प्रवाश्यांना उतरवले रावेरमध्ये; प्रवाश्यांच्या तक्रारीने बस पोहचली थेट पोलीस ठाण्यात
खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी, दीड पट भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट

रावेर|प्रतिनिधी raver

दिवाळीच्या सणासुदीला महानगरात असलेल्या चाकरमान्यांना गावाकडे परतीचे वेध लागले आहे,यासाठी ट्रॅव्हल्स व रेल्वेत प्रचंड गर्दी होत आहे.याचाच फायदा खाजगी ट्रॅव्हल्स चालक घेत आहे,पुणे ते बऱ्हाणपूर, धारणी यासाठी अतिरिक्त भाडे आकारणी करून, प्रवाशांना रावेर मध्ये उतरवण्याचा प्रकार सुरू असल्याची बाब बुधवारी सकाळी काही प्रवाश्यांनी रावेर पोलीसांच्या लक्षात आणून दिली, त्यानंतर थेट ट्रॅव्हल्स पोलीस ठाण्यात आणून चौकशी करतांना निदर्शनास आले की, पुणे ते बऱ्हाणपूर,खंडवा अशा प्रवासासाठी डायरेक्ट दीड पट म्हणजे दोन हजारापर्यन्त भाडे आकारणी करून प्रवाशांची चांगलीच लूट केली जात आहे.

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी, दीड पट भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट
सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

शिवाय ज्या स्टॉप पर्यन्त तिकीट दिले आहे,त्या ठिकाणी प्रवासी पोहचवण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.हा प्रकार खंडवा येथील प्रवाश्यानी रावेर पोलिसांच्या कानावर टाकला, बस थेट पोलीस ठाण्या जवळ आणून कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी सुरवात केल्यावर, त्या प्रवाशांना दुसरी भाड्याची गाडी उपलब्ध करून दिल्याने हा वाद मिटला आहे. मात्र होणारी लूट थांबावी अशी प्रतिक्रिया आता समाज माध्यमातून व्यक्त होत आहे.

आंतरराज्यीय वाहतुकीचे परमिट नसूनही थेट मध्य प्रदेशातील तिकीट

महाराष्ट्रात चालणाऱ्या ट्रॅव्हल्सचे मध्यप्रदेशातील परमिट नसतांना देखील,मनमानी करून तिकीट बऱ्हाणपूर-खंडवा असे देऊन,प्रवाशांची लूट केल्याची बाब यातून समोर आली आहे.परमीट नसतानादेखील जर तिकीट देऊन प्रवाशांना मध्येच सोडले जात असेल तर या ट्रॅव्हलवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com