
सावखेडा ता. रावेर Savkheda- वार्ताहर
सावखेडा, लोहारा गौरखेडा, कुंभारखेडा परिसरात आज दि. ८ रोजी वादळी वाऱ्याने हजेरी लावून परिसराला पुन्हा वादळी पावसाचा (stormy rain) तडाखा दिला. यात शेतकऱ्यांच्या केळी बागांचे व सावखेडा परिसरातील गावातील घरांचे अतोनात नुकसान झाले आहे.
काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये वादळी वाऱ्याने थैमान घालून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे आजही या वादळी वाऱ्याने तडाखा देऊन शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या आहेत. आताही सावखेडा, गौरखेडा, लोहारा, कुंभारखेडा परिसरातील शेतकऱ्यांच्या केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला गेला असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सावखेडा परिसरात या वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले आहेत. गावातील पोल, विद्युत तारा तुटून पडले असून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तरी शासनाकडून या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी, ही अपेक्षा शेतकरी, ग्रामस्थ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
१५० वर्ष जुने असलेले वटवृक्ष उन्ममळून पडला
सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायत जवळ असलेले १५० वर्ष जुने असलेला वटवृक्ष (old banyan tree collapsed) उन्मळून पडला. या वटवृक्षाच्या सावली खाली गावातील वयोवृद्ध ग्रामस्थ आराम करायचे. हे खूप वर्षांपूर्वी चे जुने वटवृक्ष पडल्याने वयोवृद्ध व ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत. प्रल्हाद बाबुराव पाटील यांनी नुकतेच सोनालिका कंपनीचे नवीन ट्रॅक्टर (Tractor) घेतलेले होते व त्यांच्या घराजवळ लावले असता त्या ट्रॅक्टरवर (Tractor) वटवृक्ष (banyan tree) पडल्याने त्या वटवृक्षाखाली ट्रॅक्टर (Tractor) दाबले गेले व त्याखाली प्रल्हाद बाबुराव पाटील यांची तीन मजली इमारत वटवृक्षाखाली दाबली गेली . त्यात त्यांच्या घरातील फ्रीज, कुलर, टीव्ही,धान्यसाठा व इतर घरगुती सामान यांचे खूप नुकसान झाले आहे.