जळगाव जिल्ह्यातील 2200 उपद्रवी पोलीस दलाच्या रडारवर

गणेशोत्सव : 474 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
जळगाव जिल्ह्यातील 2200 उपद्रवी पोलीस दलाच्या रडारवर

जळगाव jalgaon प्रतिनिधी

गणेशोत्सव Ganeshotsav दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. तसेच आगामी काळातील उत्सवांच्या पार्श्वभूमिवर अनुचित घटना घडू नये म्हणून जिल्ह्यातील 2 हजार 200 उपद्रवी पोलीस दलाच्या रडारवर आहे. जिल्हाभरातील 2200 उपद्रवी riotous गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी 474 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई Preventive action पूर्ण करण्यात आली आहे. तर 1 हजार 826 प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर हे जिल्हादौर्‍यावर आले होते. यादरम्यान त्यांनी आढावा बैठक घेवून जिल्ह्याच्या कारभाराचा आढावा घेतला होता. बैठकीत शेखर यांनी आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमिवर रेकार्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवावी, तसेच खबर्‍यांचे नेटवर्क तयार करुन उपद्रवींवर उत्सवापूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाईच्या सुचना केल्या होत्या.

त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गणेशोत्सवासह सण शांततेत साजरे व्हावे यासाठी सर्व पोलीस ठाण्यांकडून त्या त्या ठिकाणच्या उपद्रवींची यादी मागविण्यात आली. यात 2 हजार 200 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

यात 474 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 1 हजार 826 उपद्रवी रडारवर आहेत, अशी माहिती पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com