पोळ्याच्या दिवशी बिथरलेला बैल छतावरुन पडला

वावडदा येथील घटना
पोळ्याच्या दिवशी बिथरलेला बैल छतावरुन पडला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पोळा साजरा (Celebrating the hive) करीत असतांना बैल अचानक (bull suddenly) बिथरला. त्यामुळे बिथरलेला बैल घराच्या छतावर(roof of the house) चढला. दरम्यान, छताला कठडे नसल्याने बैल छतावरुन खाली कोसळून (Falling down ) गंभीर जखमी (seriously injured) झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील वावडदा (Vavadda) येथे शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ माजली आहे.

जिल्ह्यात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव तालुक्यातील वावडदा येथील गोकूळवाडा येथे पोळा सण साजरा करत असतांना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एका शेतकर्‍याचा बैल अचानक बिथरला. त्यामुळे बिथरलेला बैल हा त्याठिकाणवरील एका घराच्या जिन्यावरुन थेट छतावर चढला. यावेळी शेतकर्‍यासह गावातील काही नागरिकांनी त्या बैलाला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र बैल बिथरलेला असल्याने तो थेट छतावरुन खाली कोसळला.

घटनेमुळे गावात खळबळ

याठिकाणी रस्त्यावर खाली सिमेंट काँक्रीटचा रोड असल्याने या घटनेत नंदीबैल गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेमुळे वावडदा गावात खळबळ माजली आहे. घटना घडल्यानंतर पशू वैद्यकीय अधिकारी यांना बोलावण्यात आले आहे. बैलाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहित गावकर्‍यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com