आज ओंकारेश्वर मंदिर दिवसभर खुले

आज ओंकारेश्वर मंदिर दिवसभर खुले
Kaushik K Shil

जळगाव । jalgaon

येथील प्रसिध्द भाविकांचे श्रध्दस्थान असलेल श्री ओंकारेश्वर मंदिर (Shri Omkareshwar Temple) 1 ऑगस्टपासून श्रावण सोमवारनिमित्त (AShravan Monday) दिवसभर खुले (Open all day) राहणार आहे.

भाविकांना येण्याजाण्यासाठी स्वतंत्र पाईपांचे रेलिंग लावण्यात आले आहे. श्रावण मासातील प्रथम श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच मुंबईहून विशेष आणलेल्या फुलांव्दारे नयनरम्य श्रृंगार करण्यात येणार आहे.

सकाळी 5 ते 7 या वेळात शिव अभिषेक पूजन, 9 ते 12 वा. विशेष श्री लघू रुद्र अभिषेक पूजन प्रदीप बेहेडे यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी 12 वाजता अभिजीत मुहूर्ताला 108 निरांजनीव्दारे महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत श्री लघूरुद्र अभिषेक कार्यक्रम प्रदीप जाखेटे यांच्याहस्ते होईल.

सायंकाळी 6.15 वाजता आरती होणार आहे. रात्री 9.30 ते 12 वाजेदरम्यान श्री सत्संग भजन मंडळ यांचे सुश्राव्य शिव भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे विश्वस्थ दीपक जोशी यांनी आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com