अपार्टमेंटच्या आगीत वृद्धाचा मृत्यू

भुसावळच्या महेश नगरातील पहाटेची घटना : मुलगा जखमी
अपार्टमेंटच्या आगीत वृद्धाचा मृत्यू

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

येथील महेश नगरातील (Mahesh Nagar) निकुंज अपार्टमेंट (Nikunj Apartments) मधील एका घराला आग लागून आगीत वृद्धाचा मृत्यु तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना 26 रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. या आगीत तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास महामार्गावर असलेल्या ट्रॉमा सेंटरच्या (Trauma Center) परिसरात ही आग लागली होती.

शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयामागील महेश कॉलनी परीसरात सोना एजन्सीजवळ निकुंज अपार्टमेंटमध्ये (Nikunj Apartments) दुसर्‍या मजल्यावर केशवलाल वाधवाणी हे कुटुंबासह राहतात. 26 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असताना घराला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने (fire) भिषण रुप धारण केलं.

घरातील लोकांना काही कळायच्या आत आग संपुर्ण घरात पसरली. यात केशवलाल वाधवानी (वय 55) यांचा होरपळून मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा लखन वाधवानी (वय 32) हा जखमी झाला असून, त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात (Dr. At Ulhas Patil Medical Hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेत घरातील सर्व सामान जळून खाक झाला आहे.

वाधवानी यांच्या घरातून आरोळ्या ऐकू येत होत्या तर आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. हे दृष्य पाहून रहिवाशांनी लागलीच धाव घेवून मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नागरीकांनी तातडीने अग्नीशामन दल आणि बाजारपेठ पोलिसांना माहिती सूचित केली तर अग्निशमन दलाचे प्रवीण मीठे, चालक रफिक शेख, संजू जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत एका बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले.

Related Stories

No stories found.