
शरद बोदडे
मुक्ताईनगर Muktainagar
येथील शासकीय धान्य गोडाऊन (Govt Grain Godown)मध्ये तहसीलदारांसह अधिकाऱ्यांच्या (Officers including Tehsildar) संगनमतातून मोठ्या प्रमाणात धान्याची (Manipulation of grain) हेराफेरी करण्यात येत असून त्याचा भुर्दंड स्वस्त धान्य (cheap grain shopkeeper)दुकानदार तसेच सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे असे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षापासून सुरू असल्याने तालुक्यात पुरवठा विभागा (supply department) बाबत तसेच प्रशासनाबाबत (administration) नाराजी (displeasure) व्यक्त केली जात आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात 82 गावांचा समावेश असून तालुक्यात सुमारे 85 स्वस्त धान्य दुकाने आहेत या शासकीय घोटाळा मध्ये गहू तांदूळ कधी साखर कधी डाळी अशा धान्याची आवक होते व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते मुक्ताईनगर तालुक्यात मुख्य शासकीय गोडाऊन मुक्ताईनगर येथे तहसीलदार यांच्या निवासस्थाना शेजारीच आहे. या शासकीय गोडाऊनमध्ये बाहेरून आलेला प्रत्येक कट्टा 50 किलोचा धान्याचा कट्टा असतो. परंतु मुक्ताईनगर येथे शासकीय गोडाऊनच्या आवारातच प्रत्येक कट्ट्यातून सुमारे एक ते दीड किलो धान्य काढून घेतले जाते व नंतर तो कट्टा पुन्हा जैसे थे शिलाई करून गोडाऊनमध्ये रचून ठेवण्यात येतो.
या ठिकाणी शेकडो क्विंटल धान्याची आवक आहे त्या प्रत्येक कट्ट्यामधून धान्य काढून ते कट्टे मुक्ताईनगर तालुक्यातील 82 गावांना शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत पोहोचविले जातात यासंदर्भात दुकानदारांनी ओरड केल्यास त्यांच्यावर दडपशाही केली जाते व शेवटी नाईलाज असतो दुकानदारांना तेरी भी चूप व मेरीभी चूप या न्यायाने वागावे लागते यात दुकानदाराना कमी आलेले धान्य ग्राहकांच्याही पदरात कमीच पडते त्याप्रमाणे सामान्य नागरिकांना थोड्या बहुत फरकाने कमी प्रमाणातच धान्य वितरित करण्यात येते.
त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांसह सामान्य नागरिकांचीही यामध्ये अप्रत्यक्षरीत्या लुबाडणूक होत असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांसह सामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी दोन वेळेस गोडाऊनमध्ये आढळून आले कमी वजनाचे कट्टे ?
दरम्यान यापूर्वी मुक्ताईनगर येथील मुख्य शासकीय धान्य गोडाऊन मध्ये तत्कालीन समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे यांनी तसेच विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी गेल्यामुळे त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी थेट गोडाऊन गाठले होते. या ठिकाणी सर्व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनाही बोलावून व्हिडिओ शूटिंग करण्यात आली. त्यात प्रत्यक्ष प्रत्येक कट्ट्याचे वजन मोजमाप करण्यात आला असता त्यातील प्रत्येक कट्ट्यामध्ये कमी धान्य आढळून आले.
यावेळेस तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती यांना मात्र उत्तरे देता आली नव्हती. आमदारांनी तसेच तत्कालीन समाज कल्याण सभापतींनी विचारलेल्या प्रश्नांमुळे विद्यमान तहसीलदार श्रीमती शेता संचेती यांची भंबेरी उडाली होती कारण प्रत्यक्ष पुरावे आढळून आल्याने तसेच मुद्देमाल सापडून आल्याने काय उत्तर द्यावे हा प्रश्न तहसीलदारांसमोर होता. तरीही त्यांनी या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
शासकीय गोडाऊनमध्ये मोठा झोल ?
मागील वेळेस शासकीय गोडाऊन मधील लाखो रुपयाचा मका व ज्वारी यांचा झोल तहसीलदार व संबंधित अधिकारी तसेच काळाबाजारात विक्रीसाठी नेणारे ठेकेदार यांच्या संगणमताने करण्यात आला होता त्या संदर्भातही आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदारांना धारेवर धरले होते परंतु या प्रकरणात लाखो रुपयाचा चांगला मका व चांगल्या गरजेची ज्वारी मोठ्या व्यापाऱ्यास लाखो रुपये घेऊन देण्यात आली. त्या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचा व खराब झालेले धान्य की जे धान्य प्राणी सुद्धा खाणार नाही असे धान्य गोडाऊन मध्ये आणण्यात आले होते व त्याचेच वितरण करण्यात आले होते यामुळे प्रत्येक वेळेस मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य गोडाऊन मध्ये झोल होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. परंतु त्यावर मात्र अद्यापही अंकुश लावण्यात येथील लोकप्रतिनिधींना सपशेल अपयश आले आहे.
अधिकाऱ्यांचा डल्ला टक्केवारीवर ?
मुक्ताईनगर तालुक्यात शासकीय धान्य गोडाऊन मध्ये आलेले मोफत चे धान्य तसेच इतर धान्य यांच्या वितरणासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून दिवाळीच्या कालावधीत तहसीलदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दहा टक्के रक्कम घेतल्याचे काहींनी नाव ना जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे त्यामुळे येथील अधिकाऱ्यांचा डल्ला टक्केवारीवरच असल्याने सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष पुरवण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.