एसपींच्या बंगल्या शेजारील भिंतीवर आक्षेपार्ह पोस्ट

टवाळखोराचा शोध घेण्याचे एलसीबीला सूचना; पोलिसात नोंद
एसपींच्या बंगल्या शेजारील भिंतीवर आक्षेपार्ह पोस्ट

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील काव्यरत्नवली चौकालगत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे (Superintendent of Police Dr. Praveen Mundhe) यांचे निवासस्थान (Residence) आहे. त्यांच्या बंगल्याला लागून मेहरूनकडे जाणार्‍या रस्त्यावरील भिंत (Road wall) असून या ठिकाणी काही टवाळखोरांनी (Tawalkhors) समाज व्यवस्थेचा (against social system) निषेध करणारी पोस्ट लिहिलेली (Post written) होती. सकाळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भिंतीवर लिहिलेले ठिकाणी रंग मारून ते मिटवण्यात आले. या प्रकारची दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात (police)घटनेची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील काव्यरत्नवली चौकात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचेङ्घअभयफ हे निवासस्थान आहे. त्यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला काव्यरत्नावली चौकाला पादचार्‍यांसाठी फूटपाथ तयार करण्यात आला आहे. तसेच याठिकाणी एक भिंत असून त्याठिकाणी काही वर्षांपुर्वी माणुसकीची भिंत हा उपक्रम राबविण्यात आला होता. दरम्यान, शनिवारी रात्रीच्या सुमारास या भिंतीवर काही टारगट व टवाळखोरांकडून समाजव्यवस्थेचा निषेध करुन त्यांना शिवीगाह करणारा आक्षेपार्ह संदेश लिहीला होता. सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने दिवसभर या प्रकाराची चर्चा परिसरात सुरु होती.

रंग मारुन हटविली पोस्ट

या प्रकाराची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्ळी धाव घेतली. त्यांच्याकडून संदेश लिहीलेल्या भिंतीवर रंग मारुन ती पोस्ट हटविण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रविंद्र चौधरी यांच्या तक्रारीरुन रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपुर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे

शहरातील काव्यरत्नावली चौकात दिवसासह रात्री देखील नागरिकांची प्रचंड गर्दी असते. दरम्यान हा संपुर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असून हा प्रकार कुठल्या ना कुठल्या कॅमेर्‍यात कैद झालाच असेल. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे काम सुरु होते.

टवाखोरांना शोध घेण्याच्या सूचना

या प्रकराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी तात्काळ हा प्रकार करणार्‍या टवाळखोरांचा शोध घेण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहे. त्यानुसार पथक संशयितांचा शोध घेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com