जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!

बारावीच्या परीक्षेस सुरुवात; कॉपीमुक्त अभियानाचा उडाला फज्जा
जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

जिल्ह्यातील 76 केंद्रांवर इयत्ता बारावीच्या (12th Exams) लेखी परीक्षेस दि. 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर झडती करुनच प्रवेशहॉलमध्ये परीर्थींना प्रवेश दिला जात होता. त्यामुळे सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी झाली होती. कॉपीमुक्तीला आळा घालण्यासाठी यंदा प्रथमच परीक्षा सुरु असताना परीक्षा केंद्रावर व्हीडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली. मात्र, शहरातील एका परीक्षा केंदाच्या मागील बाजून कॉपी (copies)पुरविण्यासाठी तरुणांची धडपड सुरु होती. प्रशासनाच्या (District Administration) नाकावर टिच्चून कॉपी पुरविली जात असल्याने कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला.

जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!
पोलिसाची पत्नीला क्रूर वागणूक, सासरच्यांविरोधात तक्रार झाली दाखल

यंदा बारावीसाठी जिल्ह्यात 76 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 44 हजार 541 परीक्षार्थी असून 43 हजार 511 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 1 हजार 30 विद्यार्थी गैरहजर होते. कोविड काळातील दोन वर्षानंतर पहिल्यांदाच खुल्या वातावरणात परीक्षा होत असल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. मात्र, जिल्हा प्रशासनांने नियोजनबद्ध कामे वाटून दिल्याने जिल्ह्यात शांततेत परीक्षा पार पडल्या.

जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!
मित्रच झाला मित्राचा वैरी, चॉपरने सपासप वार करी

आज इयत्ता बारावीच्या इंग्रजीचा पेपर अतिशय शांत वातावरणात आणि सुरळीतपणे परीक्षा पार पडलेली आहे. कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा अवलंब जिल्ह्यामध्ये झालेला दिसला नाही. जिल्ह्यात जि.प.सीईओ डॉ. पंकज आशिया व उपजिल्हाधिकारी व निवासी जिल्हाधिकारी यांनी काही केंद्रांवर भेटी दिल्या. तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये प्रांत अधिकारी आणि तहसीलदार तसेच गटविकास अधिकार्‍यांचे भरारी पथक कार्यरत होते.

जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!
Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

कॉपी पुरविण्यासाठी अशीही कसरत

शहरातील एका परीक्षा केंद्राच्या इमातीच्या मागील बाजूने मित्राला कॉपी पुरविण्यासाठी एका परीक्षा केंद्राच्या मागील बाजून गेटच्या सज्यावर चढत खिडकीजवळ पोहोचला आणि कॉपी पुरविण्यासाठी त्या तरुणांची धडपड सुरु होती. कॅमेर्‍याची नजर पडताच त्या तरुणाने उडी मारुन धूम ठोकली. तर दुसर्‍या महाविद्यालयाच्या आवाराबाहेर आठ ते दहा तरुणांची गर्दी जमून गप्पा गोष्टींमध्ये ‘परीक्षा’वरच चर्चा झडत होती.

जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!
Crime Story# बुरखा घालून न्यायालयात घेणार होते...

बैठे पथकासह फिरत्या पथकाचा समावेश

कारोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर दि. 21 फेब्रवारीपासून बारावीची परीक्षा ऑफलाईन सुरु झाली आहे. जळगाव जिल्ह्यात या परीक्षेसाठी 76 केंद्रांवर परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांवरुन 47 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले असून यंदा ऑफलाइन परीक्षा घेण्यात आल्या असून केंद्रपरिसरात बैठे भरारी पथकासह फिरत्या पथकाचा देखील समावेश करण्यात आला होता.तसेच परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाविद्यालय परिसरात निर्भया पथक

परीक्षा केंद्राबाहेर टवाळखोर तरुणांकडून विद्यार्थिनींची छेडखानी हेऊन नये, म्हणून शहरातील डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे, नूतन मराठा महाविद्यालय, आर.आर.विद्यालय परिसरात परीक्षा सुरु असताना निर्भया पथकाकडून पाहणी करण्यात आली. या फिरत्या निर्भया पथकामुळे काही प्रमाणात का? होईना टवाळखोर तरुणांच्या उचापतींना ब्रेक लागला आहे. जिल्हाभरात परीक्षा केंद्र परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्याकामी चांगली मदत केल्याचे डॉ.नितीन बच्छाव यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!
Beauty Part 3 : हिवाळा ते उन्हाळा संक्रमणासाठी आपली त्वचा सज्ज करा...

परीक्षा केंद्रावर व्हीडिओ रेकार्डिंग

शहरातील महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवर मंगळवारी सकाळी 10.30 वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सकाळी 11 ते 2 वाजेदरम्यान परीर्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडू नये,म्हणून केंद्रप्रमुखांसह भरारी पथकांकडून पाहणी करण्यात येत होती. यंदा प्रथमच परीक्षा केंद्रांवर व्हीडिओ व मोबाईल रेकार्डिंग देखील करण्यात आली. त्यामुळे संदेनशील केंद्रावर देखील कॉपी प्रकरणाला आळा बसल्याची चर्चा सुरु होती.

जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून कॉप्यांचा सुळसुळाट!
Makeup Part 4 # असा करा Self makeup
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com